Homeआरोग्यभाजपा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्याने १००७ रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने केले विक्रमी...

भाजपा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्याने १००७ रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने केले विक्रमी रक्तदान…

कोरोनाच्या संकटाचा सामना करताना जिल्ह्यात पुरेसा रक्तसाठा असावा त्याशिवाय या महामारीचा सामना करू शकणार नाही, यासाठी माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी लॉकडाऊन काळात सलग 35 दिवस रक्तदान शिबिर आयोजित केले होते . या महामारीच्या काळात अनेकदा आपल्या कार्यकर्त्याना रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन ही केलेले आहे, लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत कार्यकर्त्यांनी *चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाला मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचा संकल्प केला.*

काल दिनांक 21 नोव्हेंबर रोजी वाढदिवस जिल्हात अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला घुग्गुस,पोंभुर्णा,वरोरा,भद्रावती ,कोरपना येथे रक्तदान शिबिर घेऊन केलेला संकल्प पूर्णत्वास नेला .

घुग्गूस येथे 719 ,भद्रावती 61, वरोरा 35 , कोरपना 116, तर पोंभुर्णा येथे 76 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले . एकूण 1007 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 16 वर्षांपासून देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाला मोठ्या संख्येने रक्तदान होत असते. दरवर्षीपेक्षा यावेळी विक्रमी रक्तदान करून रक्तदात्यांनी एक विक्रम केला आहे.या अनोख्या उपक्रमासाठी व विक्रमासाठी देवराव भोंगळे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले .

चंद्रपूर शहरात दोन ठिकाणी सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले. जनधन खाते ,पोस्टाच्या योजना ,मोफत आधारकार्ड दुरुस्ती सोबत अपडेट्स ,राशनकार्ड,सुकन्या योजना ,नवीन मतदानकार्ड ,प्रधानमंत्री जीवणनज्योति योजना, ज्येष्ठांचे हयात प्रमाणपत्र,मोफत काढून देण्यात आले .

राजुरा शहरात भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे व स्नेह मिलनाचे आयोजन करण्यात आले

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!