घुग्घुस येथील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतिने स्वच्छता अभियान

0
237

घुग्घुस / पंकज रामटेके

घुग्घुस येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्राथमिक आरोग्य केंद्र, घुग्घुस पोलीस स्टेशन परिसरात या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले.

स्वच्छता अभियानात सदस्यांनी स्वंयफुर्तीने भाग घेत परिसरातील प्लास्टिक, घान कचरा मोठ्या पिशवीत गोळा केला.

१९ ऑक्टोंबर ते १८ नोव्हेंबर पर्यंत पर्यावरण महिना असल्यामुळे ही जनजागृती करण्यासाठी घुग्घुस परिसरात आज गुरवार पासुन हि मोहीम राबविण्यात आली आहे व या पुढे पण असेच अभियान राबविण्यात येनार व परिसरातील जनतेचे आम्हाला सहकार्य मिळेल अशी आशा आहे.

या अभियानात मंडळाचे पदाधिकारी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष महेशभाऊ शेंडे, चंद्रपुर जिल्हासंघटक हेमराजभाऊ बावणे , जिल्हासचिव महेशभाऊ किन्नाके , उपजिल्हाध्यक्ष गणेशभाऊ शेंडे, तालुकाअध्यक्ष चेतनभाऊ बोबडे, कोमलभाऊ ठाकरे , शुभमभाऊ यादव, गोलूभाऊ आणी
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here