राहुल आंबोरकर यांनी रक्तदान करून वाचविला महिलेचा जीव

0
211

 

गडचिरोली प्रतिनिधी/ सतिश कुसराम

कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना ए निगेटिव्ह सारखा दुर्मिळ रक्तगट मिळवून एक मातेचा व तिच्या बाळाचा जीव वाचवून बाळंतपणासाठी आलेल्या एक मातेचा जीव वाचविण्यात काही सामाजिक बांधिलकी जोपासत असलेल्या युवकांकडून करण्यात आला.
कविता होमकांत उपरिकर ठाणेगाव ही महिला प्रसूती साठी महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे भरती होत्या पण त्यांना अत्यंत दुर्मिळ असलेल्या A निगेटिव्ह रक्ताची अत्यंत गरज होती. त्यामुळे त्यांची खूप धावपळ होत होती. आणि त्याच दरम्यान ऑल अडमीन ब्लड ग्रुप गडचिरोली चे सदस्य आनंद पिपरे यांच्याशी संपर्क साधला व त्याच्या एका कॉल वर आनंद पिपरे यांनी आपल्या संपर्कातील अत्यंत दुर्मिळ रक्तगट A निगेटिव्ह असलेल्या श्री. राहुल कालिदास आंबोरकर या रक्तदात्याशी संपर्क करून गरोदर महिलेला वेळेवर रक्त उपलब्ध करून दिला.
त्यामुळे आपल्या समाजात सामाजिक बांधिलकी जपत युवक उदार मनाने सेवेसाठी पुढे धजावत आहेत याची सार्थ कल्पना नक्कीच येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here