Homeचंद्रपूरआनलाँइन मोबाईल खरेदीत युवकाची फसवणूक झाल्याने युवकाची आत्महत्या

आनलाँइन मोबाईल खरेदीत युवकाची फसवणूक झाल्याने युवकाची आत्महत्या

Advertisements

आनलाँइन मोबाईल खरेदीत युवकाची फसवणूक झाल्याने युवकाची आत्महत्या

Advertisements

चंद्रपूर प्रतिनिधी कैलास दुर्योधन

चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथे ऑनलाइन खरेदीत युवकाची फसवणूक झाल्याने 18 वर्षीय मुलाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

रोहित जांभुळे असे मृतक मुलाचे नाव आहे, काही दिवसांपूर्वी रोहितने ऑनलाइन मोबाईल बुक केला होता, त्या मोबाईलची किंमत 15 हजार रुपये होती, रोहितने 10 हजार रुपये ऑनलाइनच्या माध्यमातून ट्रान्सफर केले होते व उर्वरित 5 हजार रुपये मोबाईल आल्यावर द्यायचे होते.मोबाईल आल्यावर रोहितला पोस्ट ऑफिस मधून कॉल आला उर्वरित रक्कम जमा करून आपले पार्सल घेऊन जावे असे त्याला सांगितल्या गेले.

त्याने उर्वरित 5 हजार रुपये आईला मागितले, आईने पैश्याची जुळवाजुळव करीत त्याला 5 हजार रुपये दिले असता रोहितने पार्सल घरी आणले.
पार्सल ला उघडल्यावर बघितले असता रोहितला जणू धक्काच बसला त्या पार्सल मध्ये मोबाईल नसून 2 पॉकेट व 1 बेल्ट व खर्डा अश्या बिनकामी वस्तू आढळल्या.
आपली फसवणूक झाली हे रोहितच्या लक्षात आले, त्याने लगेच ऑनलाइन कंपनीला कॉल लावला परंतु फोन काही लागत नव्हता, घरची परिस्थिती नाजूक व 15 हजारांची फसवणूक आता आई वडील आपल्यावर चिडणार ही भीती त्याच्या मनात शिरली.
रोहितच्या मनावर परिणाम झाल्याने तो घरून निघून गेला, रोहित घरी न परतल्याने आई व मित्रांनी त्याचा शोध घेतला परंतु रोहित कुठे मिळत नव्हता.
9 ऑक्टोम्बरला शेताजवळील विहिरीजवळ गाडी व कपडे काही महिलांना आढळले, ही बाब गावात वाऱ्यासारखी पसरली विहिरीत शोध घेतला असता रोहितचा मृतदेह आढळला.
रोहितने कंबरेला दगड बांधून विहिरीत उडी घेतली होती.
गावातील नागरिकांनी त्या ऑनलाइन कंपनीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली.
आजच्या ऑनलाइनच्या जगात खातरजमा न करता अनेकजण नागरिकांना लुबाडण्याचे धंदे सुरू आहे.

Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!