चिंचाळा येथील स्मशानभूमीचे निकृष्ट बांधकाम

0
194

उलगुलान संघटनेचे निवेदन  ;संबंधित ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी कैलास दुर्योधन

मुल :-
मौजा चिचाळा ता. मुल जि. चंद्रपूर येथील ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले. सदर स्मशानभूमीचे बांधकाम लाॅकडाउन काळातच करण्यात आले होते. ज्यावेळेस उलगुलान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदर स्मशानभूमीला भेट दिली असता तेथील बांधकाम अतिशय निकृष्ट करण्यात आले असे आढळून आले. संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमतानेच मोठा भ्रष्टाचार करून बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले. संबंधित अधिकाऱ्याने बांधकाम निकृष्ट दर्जाचे असतांनाही याची चौकशी न करता बिले मंजूर कशी केली? यामध्ये ठेकेदार व अधिकारी पूर्णतः दोषी असून मोठ्या प्रमाणात सदर बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे आढळून येत आहे. याची गंभीर दखल घेऊन सदर बांधकामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी व दोषी ठेकेदार व अधिकारी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी उलगुलान संघटने द्वारा निवेदन देऊन करण्यात आली.
सदर घटनेची तात्काळ चौकशी करून सदर दोषींवर कारवाई करण्यात आली नाही तर उलगुलान संघटना आक्रमक पवित्रा घेणार व या विरोधात तीव्र आंदोलन करणार. असा इशारा उलगुलान संघटनेच्या वतीने देण्यात आला. तहसीलदार मूल यांना निवेदन देताना उलगुलान संघटनेचे शाखाअध्यक्ष निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे, प्रमोद मंक्कीवार, गणेश पुन्नावार, सोमेश्वर चीटलवार तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here