कोरोना केंद्रातील महिला रुग्णांना सुरक्षा प्रधान करा

0
182

गडचिरोली नगर परिषद नगराध्यक्ष सौ. योगिता प्रमोद पिपरे
भाजपा महिला आघाडीचा पुढाकार

गडचिरोली प्रतिनिधी/ नितेश खडसे

भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आज 6 ऑक्टोबर रोजी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली व मा. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली याना मा. नगराध्यक्ष सौ. योगिता प्रमोद पिपरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून महाराष्ट्रला सुद्धा आपल्या विळख्यात घेतला आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात महिला रुग्ण भरती आहेत. त्यांच्यासोबत अनुसूचित प्रकार घडल्याचे समोर आले असल्याने गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा अनेक महिला कोरोना बाधित झाल्या आहेत. सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे कोरोना अतिदक्षता विभाग स्थापन झालेला आहे. परंतु या विभागात कोरोना बाधित महिलांसाठी स्वतंत्र कक्ष नसल्याने अनेक महिला कोरोना बाधित असुन सुध्दा दवाखान्यात भरती होण्यास घाबरत आहेत. महिलांना नेहमी सुरक्षा मिळावी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास ,उपचारा दरम्यान कोणताही अन्याय तसेच त्यांच्या मनात असुक्षतेची भावना निर्माण होऊ नये यासाठी महिला कोरोना अतिदक्षता विभाग वेगळे स्थापन करून या विभागात महिला डॉकट्टर तसेच महिला पोलीस तैनात करण्यात यावे अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या वतीने निवेदनामार्फत करण्यात आली.निवेदन देताना पाणीपुरवठा सभापती सौ. वैष्णवी नैताम,महिला बालकल्यानं सभापती सौ. लताताई लाटकर,अध्यक्ष तालुका महिला आघाडी सौ. दुर्गाताई काटवे ,महिला शहर आघाडी सौ.पल्लवीताई बारापत्रे, महिला शहर आघाडी श्रीमती प्रतिभा चौधरी, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक मा. प्रमोदजी पिपरे, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here