Homeचंद्रपूरगोंडपिंपरीएक सन्मान,उपक्रमशील शिक्षकांचा

एक सन्मान,उपक्रमशील शिक्षकांचा

 

भं.तळोधी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

गोंडपिपरी

आज दिनांक २ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा,भं.तळोधी येथे शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्धेशिय संस्था,भं.तळोधी च्या वतीने उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार २०२० प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून मान. अमर सावकार बोडलावार,माजी जिल्हा परिषद सदस्य व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून मान.नामदेव राऊत,विस्तार अधिकारी ( शिक्षण ),बीट- भं. तळोधी प्रमुख अतिथी म्हणून मा.संजय गोविंदवार,अध्यक्ष, शा.व्य.समिती,मा.मारोती अम्मावार अध्यक्ष शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्धेशिय संस्था,भं.तळोधी,मान.भानेश कंकलवार सचिव,मान.लक्ष्मण येग्गेवार,अध्यक्ष,तं.मु.स.भं तळोधी मान. अर्चना येग्गेवार, माजी ग्रा.प.सदस्य,मान.रामदास येग्गेवार,प्रतिष्ठित नागरिक,सौ. रेखा कारेकर मॅडम,उ.श्रे.मु.अ.
लेनगुरे मॅडम अंगणवाडी पर्यवेक्षिका इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

दरवर्षी विद्यार्थी गुणवत्तेसाठी व शाळा स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील जि.प.शाळेतील एका शिक्षकाला शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्धेशिय संस्था,भं.तळोधीच्या वतीने उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
या वर्षी या पुरस्कारासाठी जि.प.उच्च प्राथ.शाळा,भं.तळोधी येथील उपक्रमशील शिक्षक श्री तानाजी मारोती अल्लीवार सर प्राथ.शिक्षक यांची निवड करण्यात आली.त्यांना कार्यक्रमाचे उद्घाटक मान.अमर सावकार बोडलावार,माजी सदस्य,जि.प.चंद्रपूर यांचे हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी कोरोना काळात शाळा बंद असतांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्याअभ्यासगट,गोंडपिपरीच्या वतीने ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आले.त्यात चित्रकला
स्पर्धेत प्राथ.विभागात द्वितीय क्रमांक पटकविणा-या साहिल ढपकस,वर्ग 4 था व वक्तृत्व स्पर्धेत प्राथ.विभागात प्रथम क्रमांक पटकविणारी कु.काजल तावडे,वर्ग-4 था या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे
उत्कृष्ठ संचालन श्री दुशांत निमकर सर यांनी केले तर आभारप्रदर्शन कु अर्चना थोरात मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.सुधाकर मडावी सर,सौ. प्रणिता उईके मॅडम,आकाश झाडे,अनिल चोखारे, विकास झाडे,अरुण झगडकर,सुधीर सहारे,राजेश्वर अम्मावार सर यांनी अथक परिश्रम घेतले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!