जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची धानोरा तालुक्यात आढावा बैठक

382

 

गडचिरोली प्रतिनिधी/सतिश कुसराम

धानोरा ताुक्यातील ग्रामपंचायत मेंढा येथे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देऊन विविध विषयांवरील सविस्तर चर्चा घेऊन आढावा बैठक घेतली,यामध्ये विशेषतः आरोग्य शिक्षण महाराष्ट्र रोजगार हमी योजना व सामूहिक वनहक्क कायदा त्यामधील तरतुदी सोबत कोरोना रोगांचा वाढता प्रभाव रोखण्या संदर्भातील उपाय योजना तथा माझं कुटुंब माझी जबाबदारी ह्या विषयी सविस्तर चर्चा करून ग्रामस्थांचा सहभाग कसं घेता येईल यावर प्रबोधनात्मक सूचना देण्यात आल्या सोबतच प्रत्यक्ष लेखा मेंढा परिसरातील बांबू जंगलाची पाहणी केली त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे.सामजिक कार्यकर्ते देवाजी तोफा,महिला
सरपंच नंदा दुग्गा तथा संवर्ग विकास अधिकारी नीमसरकर साहेब आणि ग्रामपंचायत चे सचिव,पोलीस पाटील व उपकेंद्र रजोली येथील आरोग्य कर्मचारी श्री नागेश बस्वा श्रीमती के. वाय.मडावी(ANM) व आशा उषाताई आदी उपस्थित होते.