” त्या ” वाघाला जेरबंद करा ; शरद पवार विचार मंचची मागणी

0
427
Advertisements

 

चंद्रपूर / मुन्ना तावाडे

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाघाचा हल्यात ठार होण्याचा घटना वाढल्या आहेत. आज राजूरा तालुक्यातील शेतकरी वाघाचा हल्यात ठार झाला. वाघ-मानव संघर्ष जिल्ह्यात टोक गाठले आहे. हा संघर्ष उद्दभवू नये यासाठी प्रभावी उपाययोजना अमलात आणाव्या तसेच राजूरा तालुक्यातील त्या वाघाला त्वरित जेरबंद करावे अशी मागणी शशी देशकर ,निमेश मानकर यांनी केली आहे.

Advertisements

वनव्याप्त असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्षाने टोक गाठले आहे.वाघ,बिबटचा हल्यात ठार होणाऱ्यांचा आकडा दिवसेगणिक फुगत चालला आहे.या घटनांनी जंगलालगत असलेल्या गावात आणि शेतशिवारात दहशत पसरली आहे. आज राजूरा तालुक्यातील शेतकऱ्याचा बळी वाघाने घेतला. सातत्याने घडणाऱ्या या घटनांवर अंकूश लावण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.मात्र वनविभाग याबाबत गंभीर नसल्याचेच दिसून येते. याबाबत शरद पवार विचार मंचाने वनविभागाचा वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेऊन दोनदा निवेदने दिली होती.तर वनसंरक्षकांच्या कार्यालयापुढे निदर्शने दिली होती. मात्र वनविभागातील अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केले. सध्या कार्यरत असलेले अधिकारी कर्तव्य दक्ष नाहीत.यांची बदली करून नव्या अधिकार्यांची नेमणूक करावी अशी मागणी शरद पवार विचार मंचचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत देशकर,
शरद पवार विचार मंचचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष निमेश मानकर यांनी केली. सोबतच राजूरा तालुक्यात धूमाकुळ घालणाऱ्या त्या वाघाला त्वरित जेरबंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here