Home चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना स्थापणा दिना निमित्त जिवती येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

राष्ट्रीय सेवा योजना स्थापणा दिना निमित्त जिवती येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

दिपक साबने / जिवती

राष्ट्रीय सेवा योजना स्थापणा दिना निमित्त व चंद्रपूर भूषण स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा संस्थापक अध्यक्ष सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर यांचे द्वितीय स्मृतिदिन निमित्त संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्था जिवती, विदर्भ राज्य आंदोलन समिती व वि.राज्य युवा आघाडी समिती जिवती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर नुकतेच जिवती सम्पन्न झाले. सदर शिबिर फेसबुक लाईव्ह घेण्यात आले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यां व नागरिक फेसबुक लाईव्ह पेज वर कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.
भव्य रक्तदान शिबिर जिवती येथील हनुमान मंदिर परिसरात आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार, शेतकऱ्याचे नेते वामनराव चटप यांच्या हस्ते करण्यात आले. सदर शिबिराचे सह उद्घाटक इजाज शेख, जिल्हा समन्वयक, संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्था जिल्हा चंद्रपूर हे होते. सुदाम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच सदर शिबिराचे उपाध्यक्ष इरफान शेख, अध्यक्ष, संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्था तालुका जिवती हे होते. सदर शिबिराला इम्रान शेख, सचिव, संजीवनी हत्ती व शिक्षण विकास संस्था तालुका कोरपना यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार वामनराव चटप यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे यांच्या कार्याचा उजाळा दिला. व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना हा कार्यक्रम लाईव्ह बघता यावा. यादृष्टीने महाविद्यालयाने फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्याच प्रमाणे स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे यांच्या कार्याविषयी, त्यांच्या प्रत्यक्षात मुलाखती त्यांच्या यूट्यूब चैनल वरील लिंक पाठविण्यात आल्या.
कोरोना च्या संकटामुळे सर्व जग हादरून गेलं. महाराष्ट्रा मध्ये कोरोना च्या संकटाचे जाळे ओढावले गेले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जिवती, येथे रुग्णसेवक जिवन तोगरे ( रा.से.यो.स्वयंसेवक) यांच्या पुढाकारातून व, विदर्भ युवा आघाडी, जिवती चे सुदामभाऊ राठोड, विनोद पवार, संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्था जिवती अध्यक्ष, इरफान शेख व स्वयसेवक महादेव केंद्रे, संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक व कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुभाष गिरडे व प्रा. किरणकुमार मनुरे तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थी एस .आर .एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क व तसेच महाविद्यालयाचे इतर सर्व विद्यार्थी व जिवती तालुक्यातील ग्रामस्थ तसेच मानवतावादी रक्तवीर रक्तदाते यांच्या सहकार्याने संपन्न रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.
या रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरपंचायत जिवती, पोलिस, ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच शिबिराच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे आजी व माजी विद्यार्थी यामध्ये इरफान शेख, महादेव केंद्रे, कैलास लांडगे, दयानंद राठोड, मुकेश चव्हाण श्रीकांत राजपंगे, जीवन तोगरे, बालाजी शीवमोरे, अक्षय सुर्यंवशी, विलास राठोड, अरविंद चव्हाण, इरफान शेख यांनी शिबिरात सहभागी होवून अथक परिश्रम घेतले…

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्राचा कोलामगुड्यावर मुक्काम;कोलम बांधवांच्या जाणून घेतल्या व्यथा…

बळीराम काळे /जिवती जिवती:जिल्ह्यातील अतिदुर्गम,अतिमागास,आदिवासी बहुल, दुर्गम भागातील सितागुडा या कोलामगुड्यावर बच्चू कडू,राज्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्काम...

सातबारा खोडतोड व वाटप जमीन “खरेदी-विक्री “प्रकरणात तलाठ्याने निष्काळजीपणा दाखवून सुध्दा त्याचेवर अद्याप कारवाई नाही ! कागद पत्रे मागण्यास या पलिकडे तहसील कार्यालयात येवू...

चंद्रपूर :-बल्हारपूर तलाठी दप्तर मधील सातबारा खोडतोड प्रकरण उघडकीस आणणा-या प्रिया झांबरे यांना परत तहसील कार्यालयात कागदपत्रे मागण्यास येवू नये असे खडे बोल तहसीलदार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

यूजीसी नेट’च्या अर्जासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज भरता येईल. यूजीसीचे अध्यक्ष प्रा....

राष्ट्रवादीच्या पती- पत्नी नगरसेवकानी प्रभागाच्या विकासासाठी मागितला दोन कोटींचा निधी…

गोंडपिपरी(सुनील डी डोंगरे) येथील नगरपंचायतीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल ,त्यांच्या नगरसेविका पत्नी सौ सविता महेंद्रसिंह चंदेल यांनी आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी दोन कोटी रु च्या निधीची मागणी...

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्राचा कोलामगुड्यावर मुक्काम;कोलम बांधवांच्या जाणून घेतल्या व्यथा…

बळीराम काळे /जिवती जिवती:जिल्ह्यातील अतिदुर्गम,अतिमागास,आदिवासी बहुल, दुर्गम भागातील सितागुडा या कोलामगुड्यावर बच्चू कडू,राज्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्काम...

Recent Comments

Don`t copy text!