आयटीआय’च्या विद्यार्थीनीवर अत्याचार प्रकरणातील प्रशिक्षण केंद्रच बोगस

633

‘पास्को’च्या गुन्ह्यातील आरोपीच्या बयानातून ‘बल्लारपूर’ कनेक्शन उघड

सुविधा नसतानाही आर्थिक लालचेतून झाला शैक्षणिक विस्तार

गोंडपिपरी / आकाश चौधरी

गोंडपिपरी हा चंद्रपूर जिल्ह्यातील मागास व आदिवासीबहुल तालुका.या तालुक्यात मिनी आयटीआयच्या माध्यमातून दहा वर्षांपूर्वी व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाचे द्वार खुले झाले.दुरवरील युवक-युवती या प्रशिक्षण केंद्राशी जुळले.दरम्यान मिनी आयटीआय केंद्राचा बोगस कारनामा उशिरा का होईना लोकांच्या लक्षात आला.सदर केंद्राच्या माध्यमातून बिनदिक्कतपणे मिळणाऱ्या शिष्वृत्तीसाठी अनेकांनी आजपर्यंत आपले तोंड बंद ठेवले.अशातच ६ सप्टेंबर रोजी गोंडपिपरी शहरातील त्या आयटीआयच्या कार्यालयातच चक्क प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनीचा विनयभंग झाला आणि या अत्याचाराची तक्रार पोलिसात गेली.यातूनच ही आयटीआय सुध्दा बोगस राहिल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमासाठी केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती मिळताना पाहून बल्लारपूर येथील प्रशिक्षण केंद्राकडे युवक-युवतीचा ओघ वाढला.शैक्षणीक शुल्क संस्थेच्या खात्यात जमा होत राहिल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना थेट शिष्यवृत्तीचा लाभ मिळू लागला.यावेळी पाच ते सहा अभ्यासक्रमासाठी प्रवेश स्वीकारण्यात आला.सुरुवातीला तीन ते चार शैक्षणिक सत्रात प्रशिक्षणाचे वर्ग भरले.यानंतरचे प्रशिक्षण केवळ संस्थेला मिळणारी शुल्क व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती पुरतीच मर्यादित राहिली.२०१५ पूर्वी मूळ कागदपत्रांची पळताळणी न होताच येथील अभ्यासक्रमाला अनेकांचा प्रवेश निश्चित झाला.दहावीपासून तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या मंडळीने या योजनेत आपला सहभाग नोंदविला.बल्लारपूर येथील त्या संस्थेतर्गत युवक-युवतींचा प्रवेश एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला की आजपर्यंत तेवढ्या प्रशिक्षणाथ्याची सोईसुविधा व बैठकीसाठी संचालकाकडे जागाच उपलब्ध राहिली नाही.त्यामुळे या केंद्राच्या प्रवेशाला शासनाने मान्यता दिलीच कशी,हा प्रश्न उपस्थित झाला आहे.दरम्यान मान्यता मिळविण्यासाठी त्यांनी खोटी व बनावट कागदपत्रे जोडल्याची शंका यातूनच निर्माण झाली आहे.प्रशिक्षण केंद्र नावालाच उरले.अशावेळी प्रवेशाच्या नावावर चाललेली शासकीय अनुदानाची लूट थांबू नये म्हणून गैरमार्गाने बल्लारपूर येथील प्रशिक्षण केंद्राचा विस्तार करण्यात आला.या विस्तारित केंद्राची स्थापना गोंडपिपरी शहरात चार वर्षांपूर्वी झाली.शहरातील आजाद हिंद चौकात त्या केंद्राचा बोर्ड लावून मिनी आयटीआयचे कामकाज देखील सुरु झाले.या केंद्रातून बल्लारपूर येथील संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पार पडली.संस्थेकडून प्रशिक्षणाथ्याशी नियमानुसार होणारा बहुतांश व्यवहार गोंडपिपरी येथील याचठिकाणी झाला.अनेकवेळा बल्लारपूर केंद्रासह सबंधित संस्थेची प्रशासकीय व महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिनी आयटीआयच्या कार्यालयात आढळून आल्याचे परिसरातील प्रशिक्षणार्थ्यामध्ये बोलल्या जात आहे.यादरम्यान अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर प्रकरणातील आरोपी असलेल्या गोंडपिपरी येथील संचालकाने मी बल्लारपूर येथील संस्थेसाठी काम करतो,असे पोलिसांकडील आपल्या बयानात स्पश्ट केल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.