नवर्यांनो…! आज बायकोचे कौतुक कराच…! आज आहे खास दिवस

0
388

पुणे : प्रत्येक स्त्री ही नेहमीच पतीमध्ये एक मित्र शोधत असते. जो नेहमीच तिला समजून घेईल. रोज तर पत्नी तिची कर्तव्य बजावत असतेच. त्यावेळी तिचे कौतुकही केले जाते. पण प्रत्येक नात्याचं कौतुक करण्यासाठी एक दिवस ठरलेला असतो. त्या दिवशी जो तो आपले प्रेम, आदर, भावना व्यक्त करतो. त्याच पद्धतीने आज २० सप्टेंबर, ‘जागतिक पत्नी कौतुक सोहळा दिवस’. पत्नीचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. ज्यात पती आपल्या पत्नीला प्रेम आणि कौतुक दर्शविण्यासाठी त्यांच्या दिवसांमधून वेळ काढतात, आणि तिच्या प्रती असलेले प्रेम व्यक्त करतात. कुटुंबामध्ये पत्‍नीचा सहभाग हा फार महत्त्वाचा असतो.

Advertisements

पती पत्नीचे नात खूप सुंदर असते.
या नात्यात विश्वास, आपुलकी, प्रेम आणि समजूतदार हे सर्व एकत्र असत. हेच तर खरं नातं असत. पती पत्नी ही संसाराच्या गाडीची दोन चाक असतात. संसार सुरळीत चालवण्यासाठी दोन्ही चाकांना झटावं लागत. पत्नी ही त्यांच्या संसारासाठी तिचे स्वप्न,अपेक्षा सर्वच विसरून जाते. त्यामुळे पत्नी ती पत्नीचं असते.

Advertisements

एक स्त्री ही तिचे स्वतःचे अस्तित्व विसरून साखर जशी पाण्यात विरघळते, तशीच ती सासरी विरघळून संसार गोड करणारी साखर असते. नेहमीच आयुष्याच्या अवघड वाटेवर साथ देते ती पत्नी. स्वतःच्या जीवातून नवा जीव घडविणारी विश्वनिर्मिती म्हणजे पत्नी. कोणत्याही क्षणी पतीचा हात सोडत नसते ती पत्नी. वेळप्रसंगी पतीच्या पाठीशी आईसारखी भक्कम उभी राहते ती पत्नी. कितीही भांडण झाली तरी समजून घेती ती पत्नी. कुटुंबातील सर्व लोकांची काळजी घेते ती पत्नी. प्रत्येकाला सांभाळून घेते ती पत्नी. कधीही न थकता काम करत राहते ती पत्नी. अश्या प्रत्येक सुख दुःखात साथ देणाऱ्या पत्नीचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच असते. कधीही कंटाळवाणा न करता ती नेहमीच हसतमुखाने कामे करत असते.

बायको म्हणजे…

बा – तुमच्या बाजूने उभी राहणारी
य – येईल त्या परिस्थितीत साथ देणारी
को – कोणासाठी नाही तर फक्त पतीसाठी जगणारी

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here