राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या ठाणे /मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी केरबाजी डावरे यांची नियुक्ती

0
534

राज्य कार्यकारिणी वरती देखील “कार्यकारी सदस्य”म्हणून निवड

मुंबई /रवि रायपुरे ( कार्यकारी संपादक)

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र शासन. यांनी सन्मानित केलेले राज्यातील गुणवंत कामगार, संघटित व असंघटित रित्या काम करणारे कामगार यांना एकत्र घेऊन “राज्य गुणवंत कामगार असोसिएशन”ची स्थापना केली आहे. सन 2020 ला कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या कामगार असोसिएशनचे जाळे अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचले असून,कामगाराच्या हिताचे कार्य या असोसिएशनच्या मार्फत फार मोठ्या प्रमाणात झपाट्याने सुरू आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र शासन,कडून पुरस्कृत केलेले व सध्या “महानंद दूध डेअरी” गोरेगाव मुंबई,येथे सेवेत कार्यरत असलेले कामगारांचे प्रश्न वेळोवेळी शासन दरबारी मांडणारे,माननीय केरबा हरी डावरे यांचे संघटन कौशल्य व कामगाराच्या मूलभूत हक्कांची जाण,त्याचबरोबर सामाजिक व राजकीय कार्यातील बहुमोल योग दानाची दखल घेऊन “राज्य गुणवंत कामगार असोसिएशन”चे प्रदेशाध्यक्ष माननीय सुरेश केसरकर यांनी श्री. डावरे यांची राज्य कार्यकारिणीच्या कार्यकारी सदस्य व ठाणे /मुंबई जिल्हा अध्यक्ष पदावर निवड केली आहे.

भविष्यामध्ये गुणवंत कामगारांना सामाजिक व शासकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळावे,राज्यातील संघटित व असंघटित कामगाराच्या व गुणवंत कामगारांच्या न्यायहक्क मागण्याबाबत वेळोवेळी असोसिएशनच्या मार्फत पाठपुरावा करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन.त्यात कुठलीही कुचराही होणार नाही. अशी श्री. केरबा डावरे यांनी नियुक्ती प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ग्वाही दिली.

त्यांच्या या निवडीबद्दल ठाणे/ मुंबई या जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा,पुणे, नागपूर,चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांनी आनंद व्यक्त केला असून,संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या मित्र परिवाराने, समस्त नातेवाईकांनी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here