कृषि महाविद्यालयाची विद्यार्थिनी शेतकऱ्यांना देत आहे शेतीविषयक धडे

612

 

गोंडपिपरी/आकाश चौधरी

कृषी विद्यापिठात पदवीचे शिक्षण घेत असलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना राबविने सुरू आहे.त्या अंतर्गत आठ आटवडे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे. त्यासाठी गोंडपिपरी तालुक्यातील वडकूली येथील उद्यानविद्या महाविद्यालयाची विद्यार्थीनी कल्यानी बांगरे हीने सहभाग घेतला आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होनार आहे. . डाॕ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथे कृषी महाविद्यालय आहे. यात उद्यानविद्यामधे अंतिम वर्षाला कल्यानी बांगरे हीने पदवीचे शिक्षण घेत आहे. या महाविद्यालयामार्फत राबविण्यात येनार्या ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेत तीने सहभाग घेतला आहे. त्यानुसार कल्यानी हीने वडकुली गावाची निवड केली आहे. मागील महीन्याभरापासून हाउपक्रम हाती घेतला असून सुरळीत चालू आहे. यात प्रामुख्याने म्हणजे शेतकऱ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद देत आहेत. शेतकऱ्यांशी सुसंवाद साधून तीने त्यांच्या समस्या जानून त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहे. सोबतच बीज प्रक्रीयेवर मोठ्या प्रमाणात भर देत असून बिज प्रक्रीयेचे फायदे समजावून सांगत आहे. जैविक व अजैवीक बिज प्रक्रिया कशी केली जाते हे सुद्धा सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कौतूक होत आहे. श्री शिवाजी उद्यानविद्या माहाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. शशांक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम प्रभारी प्रा.मिरा डोके,प्रा कल्पना पाटील ,प्रा शितल चितोडे,प्रा जयश्री कडू,प्रा निलेश फुठाने ,प्रा निरज निस्ताने,प्रा हरीश फरकाडे, प्रा. डाँ.अतुल बोंडे यांच्या मार्गदर्शनात राबविन्यात आले.