Homeचंद्रपूरछत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही ;विविध संघटनानी दिले...

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही ;विविध संघटनानी दिले निवेदन

चंद्रपूर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची काटछाट करून राजकीय नेत्यांसोबत त्यांची तुलना केली जात असता, त्या सदरील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन विविध पक्ष तथा संघटना तर्फे आज चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.

याप्रसंगी सेल्फ रीस्पेक्ट मोव्हमेंटचे श्री बळीराज धोटे, शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, जनविकास सेना अध्यक्ष मनपा नगरसेवक श्री पप्पू देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते श्री सुनील कळे, श्री नितीन पिंपळशेंडे, श्री एजाज शेख, मनसे नेते, श्री भरत गुप्ता, प्रतिमाजी ठाकूर , संभाजी ब्रिगेडचे श्री सचिन बोधाने,श्री सौरव ठोबरे , प्रतिकजी भगत तथा शिवप्रेमी उपस्थित होते.
स्वराज्याचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे काटछाट करून, देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्याशी सतत तुलना केली जात आहे. हा सदरील प्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया ( फेसबुक,whatapp, इन्स्टाग्राम इत्यादी ) च्या माध्यमातून सतत प्रसारित केल्या जात आहे.
सदरील बाबीचा विचार केला असता जगात छत्रपती शिवाजी महाराज आदर्श स्थानी आहे. त्यामुळे असल्या राजकारण्यांची तुलना छत्रपतीशी करणे म्हणजे त्यांच्या आदर्शचा अपमान करणे होय. त्यामुळे समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे .
आतापर्यंत ज्या ज्या अशा पोस्ट फेसबुक वर टाकण्यात आलेल्या आहेत, त्या सर्व प्रति सोबत जोडण्यात आल्या आहोत. तरी मोहदय आपण यावर सायबर क्राईम ऍक्ट नुसार संबंधित दोषींवर (ज्या व्यक्तीने तथा फेसबुक पेज हँडलर )कडक कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अन्यथा त्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक मा महेश्वर रेड्डी यांना निवेदनात देण्यात आला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!