जिवती
अतिदुर्गम व अविकसित समजणारा जिवती तालुक्यातील गुडशेला ग्रामपंचायतीच्या वतीने सिमेंट काँक्रिट रस्ताचे काम सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत आहे. या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी गावातील नागरिक करताना दिसत आहे.. सिमेंट काँक्रेट रोड ठरल्याप्रमाणे करता येत नाही तसेच हा या रस्ताची फक्त थुकपालीस करीत आहे याबाबत काही ग्रामस्थांनी सरपंच यांच्या कडे तक्रार केली तसेच इंजिनियर यांच्यासोबत दूरध्वनीवर फोन केला असता त्यांनी सुद्धा उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. ग्रा पं गुडशेला येथे रस्त्याचे काम विविध योजनेतून होते आहे. रस्त्यामुळे गावांच्या विकासालाही सजग दृष्टी प्राप्त होतो पण सरपंच, ठोकेदार, इंजिनियर, व बि.डि.ओ यांच्या मनमानी कारभार सुरू आहे. यामुळे गाव विकासालाही चालना मिळात नाही आहे, असे चित्र ग्रा पं गुडशेला येथे दिसत आहे. गुडशेला ग्रामपंचायत कडे अनेक लोकप्रतिनिधीकडून व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे….