पत्नीने रागाचा भरात पतीचा गुप्तांगाला घेतला चावा…! कारण ठरले उंदीर…!

0
1639

पती-पत्नीमध्ये भांडणं झाल्यावर रागात एकमेकांना मारल्याच्या घटना आजवर आपण ऐकल्या आहे. मात्र एका महिलेला इतका राग आला की ती चक्क आपल्या पतीच्या गुप्तांगालाच चावली आहे.

आणि याचं कारण म्हणजे उंदीर. घरातील उंदराला घाबरवून त्याला घराबाहेर काढलं नाही म्हणून संतप्त झालेल्या महिलेने आपल्या पतीच्या पेनिसला चावा घेतला आहे.

झॅम्बिअन अब्जॉर्व्हरनुसार झिम्बाब्वेच्या कितवेमध्ये ही घटना घडली आहे. 52 वर्षांचे अब्राहम मुसोंडा यांच्यावर त्यांची 40 वर्षांची पत्नी मुकुपाने हल्ला केला आहे.

मुकुपा आपल्या मित्रांसह दारू पिऊन घरी परतली. ती बेडवर झोपली तेव्हा तिला तिथं उंदीर दिसला. तिने आपल्या पतीला उंदाराला घाबरून घराबाहेर काढण्यास सांगितलं. त्यामुळे दोघांमध्येही भांडण झालं.

त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की मुकुपाला इतका राग आला की तिने आपल्या पतीच्या प्राइव्हेट पार्टलाच चावा घेतला.

अब्राहम यांना गंभीर दुखापत झाली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता दोघांनाही घरात वेगवेगळ्या बेडरूममध्ये ठेवण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here