आकाश चौधरी / गोंडपीपरी.
गेल्या पन्नास वर्षापासून वास्तव्य करीत असूनही प्रशासनाने गावठाण जागेचे पट्टे दिले नाही.परिणामी अनेक गरीब कुटुंबाःना घरकुलापासून वंचीत रहावे लागत आहे.या मुद्याला घेत गोंडपिपरी भाजपचे युवा कार्यकर्ते नाना येलैवार यांनी आज उपोषण करित आःदोलन सूरू केले.या उपोषाणाची तातडीन दखल घेत येत्या महिन्याभरात गावठाणचा प्रश्न मार्गी लाऊ असे लेखी आश्वासन नवनियुक्त मुख्याधिकारी शेरकी यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
गोंडपिपरी नगरात अनेक कुटुंब गेल्या पन्नास वर्षापासून वास्तव्य करीत आहैत.अतिशय कच्च्या घरात ते कसेबसे आपल्या संसाराच रहाटगाडग चालवित आहेत.नगरपंचायतीच्या वतीन पंतप्रधान आवास योजनेची माहिती मिळाली.पण जागेच्या पट्ट्याअभावी गरीब कुटुबियाःना घरकुलापासून वंचीत रहाण्याची पाळी आली.असे शेकडो कुटुःब अद्यापही घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत.पण त्यांचा मोठाच अपेक्षाभंग झाला.यामुळ तातडीन या कुटुंबियांचे गावठाण जागेचे पट्टे द्यावे अशी मागणी करित उपोषणाचा इशारा नाना येल्लेवार यांनी दिला होता.
सातत्याने पाठपुरावा करूनही नगरपंचायतीन याकडे दुर्लक्ष केल्यान आज येल्लेवार उपोषाणाला बसले.
यानंतर तातडीन सुत्र हालली.मुख्याधिकारी डाँ.विशाखा शेरकी,नगराध्यक्ष सपना साखलवार.यांनी उपोषाणमंडपी भैट दिली.गावठाणच्या पट्ट्याकरिता लागणारी 96000 रूपयाची रक्कमेची भरणा करून हा प्रश्न महिनाभरात मार्गी लावणार असल्याची लेखी ग्वाही दिली.
यानंतर नाना येल्लेवार यांनी उपोषण मागे घेतले.
उपोषणाच्या प्रसंगी माजी आमदार संजय धोटे,तालुकाध्यक्ष बबन निकोडे,चेतन गौर,अमर बोडलावार,गणपती चौधरी,निलेश पूलगमकार,संजय झाडे,मनीष वासमवार,निलेश संगमवार,सुनील फुकट,साईनाथ माष्टे,राकेश पून यांची उपस्थीती होती.
लवकरच गावठाण जागेचे पट्टे मिळणार असल्याचे समजल्यानःतर प्रतिक्षेत असलेल्या घरकुलधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
महिनाभरात निकाली काढणार गावठाणचा प्रश्न ;येल्लेवारच्या उपोषणानंतर नंगरपंचायतीची ग्वाही
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements