गाेंडपिपरि येथील वाचनालयाचे लोकार्पण साेहळा
आकाश चौधरी/ गोंडपिपरी
नगर पंचायत गोंडपिपरी येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग क्र २ चंद्रपूर नगरपंचायत गोंडपिपरी वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत महात्मा गांधी तालुका वाचनालय इमारतीचे लोकार्पण सोहळा लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या शुभहस्ते वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना आमदार सुभाष धोटे यांनी सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी वाचनालयांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते चांगले विचार, चांगले आचार रुजविण्याचे काम या माध्यमातून होत असते. या एकविसाव्या शतकात दूरचित्रवाणी, संगणक, इंटरनेट यांच्या जमान्यात माणसे ग्रंथालयात जगण्याचे विसरू लागली आहेत. आपल्या समाजातील वाचनाची आवड असंगत होत चालली आहे. विशेषता: विद्यार्थी आणि व पुस्तके हातात घेतच नाहीत. मग वाचन, आणि चिंतन ही प्रक्रिया तर दूरच राहिली असे मत व्यक्त केले.
या लोकार्पणा सोहळ्या प्रसंगी माजी आमदार संजय धोटे, नगराध्यक्षा सपना साखलवार, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष सुरेश चौधरी, उपनगराध्यक्षा सौ शोभा संकुलवार, पंचायत समिती सभापती सौ सुनिता येगेवाड, नगरसेवक चेतनसिंह गौर, सौ सविता कुळमेथे, प्रविण नरहरशेट्टीवार, प्रदिप झाडे, सौ इंदिरा नेवारे, सौ कल्पना गेडाम, सौ लता हुलके, सौ सौ निर्मल खेवले, सुरेश चरडे, अश्विन कुसनाके, राकेश पून, मुख्याधिकारी डॉ विशाखा शेरखी, उपविभागीय अभियंता रमेश शेंभरकर,कृ.उ.बा.स उपाध्यक्ष अशोक रेचनकर,विनोद नागाूरे, देवेंद्र भट्टे, शंभुजी येल्लेकर, नामदेव सांगडे, देविदास सातपूते, अनिल झाडे, बालाजी चनकापूरे, नगरपंचायत कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.