Homeचंद्रपूरगोंडपिंपरीगोंडपिपरी क्रिडासंकूल नावापुरतेच* *साहित्याची कमतरता 

गोंडपिपरी क्रिडासंकूल नावापुरतेच* *साहित्याची कमतरता 

सेवा पुरविण्याची क्रीडाप्रेमींची मागणी

गोंडपिपरी- आकाश चौधरी

येथिल शहरालगत असलेले क्रिडासंकूल नावापूरतेच ठरले आहे.या ठिकानि क्रीडा साहित्यासह अनेक आवश्यक तात्विक बाबींची कमतरता आहे.तरी देखिल मात्र गरजेपोटी आगामी भरत्यांच्या पाश्वभुमिवर शारिरिक तंदुरुस्ती गरजेची असतांना गोंडपिपरी क्रिडासंकुलात अनागोंदी कारभार सुरु आहे.परिणामी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी युवकांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

गोंडपिपरी शहरालगत क्रिडासंकुल आहे.यात स्थानिक गोंडपिपरी शहरासह लगतच्या गावखेड्यातून शेकडो युवक व्यायामासाठी येतात.आगामी विविध विभागांच्या भरत्या लक्षात घेता संकुलात व्यायामासाठी येणाऱ्या युवकांचा आकडा दिवासागणिक वाढत आहे.अश्यातच ईकडे मात्र गोंडपिपरी क्रिडासंकुलाची दुरावस्था झाली आहे.संकुलाची सुरक्षा भिंत कोसळली आहे.आवारात गवत,कचर्याचे साम्राज्य उभे आहे.जागोजागी खड्डे पडले असून त्यात पाणि साचले आहे.ऐवढेच नाही तर क्रिडासंकुलातील व्यायामाचे साहित्यही नावालाच उरले आहे.यामुळे मिळालेले साहित्य गेले कुठे असा सवाल पुढे येत आहे.एकेकाळी आम्हीच युवकांचे खरे तारणहार आहोत,असे शहरभर डिंडोरा पिटणार्या गोंडपिपरी शहरातील युवा राजकारण्यांनी मात्र यावर कमालीची चुप्पी साधली आहे.लोकप्रतिनिधींचे तर याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे.यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी युवकांनी पत्रकार परिषदेत केली आहे. *सदर प्रकरणी क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता मागील चार महिन्याच्या काळात कोविड चा प्रादुर्भाव लक्षात घेता एका ठिकाणी गर्दी होऊ नये याची आपण काळजी घेऊन क्रीडासंकुलातील सर्व कामे प्रलंबित ठेवले असल्याचे सांगितले.* यावेळी मांगणीचे निवेदण जिल्हाधिकारी,जिल्हा क्रिडा अधिकारी,आमदार सुभाष धोटे,गोंडपिपरीचे उपविभागिय अधिकारी,तहसिलदार आदिंना देण्यात आल्याची माहिती यावेळी उपस्थित युवकांनी दिली आहे.

परवानगीनंतरच क्रिडांगण खोलणार…
गेल्या पाच महिन्यापासून देशात कोरोनाच संकट आहे.यामुळ मंदीर,क्रिडांगण,जिमखाने बंद अवस्थेत आहेत.गोंडपिपरीतील काही तरूणांनी क्रिडांगणाच्या मुददयाला घेत विविध आरोप केले आहेत.या आरोपात तथ्य नाही.सरकारने एकदा परवानगी दिल्यानंतर नियमानुसार क्रिडांगण खोलण्यात येईल.क्रिडंागणाच्या माध्यमातून तालुक्यातील होतकरू खेळाळूसाठी जास्तीत जास्त सुविधा निर्माण व्हावी.यासाठी वरिष्ट स्तरावर पाठपुरावा करणे सातत्याने सुरू आहे.
राजकुमार भोयर,
क्रिडा मार्गदर्शक,गोंडपिपरी.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!