जिल्हयात 20 कोरोनामुक्त तर नवीन 8 बाधित

0
105

 

नितेश खडसे / गडचिरोली

जिल्हयातील एकूण सक्रिय कोरोना बाधितांपैकी 20 जण आज कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील 5 स्थानिक, आरमोरीतील 12 व कोरचीतील 3 जणांचा समावेश आहे. या प्रकारे 20 जण आज कोरोनामुक्त झाले आहेत.
नव्याने आज 8 बाधित : नवीन 8 बाधितांमध्ये चामोर्शी आष्टी येथील ग्रामीण रूग्णालय 1 वैद्यकिय अधिकारी, 1 रूग्ण व 1 प्रतिबंधात्मक क्षेत्रातील असे 3 कोरोना बाधित आढळून आले. चामोर्शी प्रतिबंधात्मक येथील 2, एटापल्ली 1 एसआरपीएफ, अहेरि येथील नागपूर वरून आलेला 1 जण व नागपूर येथून गडचिरोली येथे नागपूरहून आलेला 1 कैदी असे आज 8 नवीन कोरोना बाधित आढळून आले. यामूळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 98 झाली तर आत्तापर्यंत 837 जणांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्हयातील एकूण कोरोनाची बाधा झालेल्या लोकांची संख्या 936 झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here