श्री श्री दुर्गापूजा समिती भामरागड तर्फे भव्य रक्तदान व आरोग्य रक्त चाचणी शिबिराचे आयोजन…

50

22 रक्तदात्यांनी केले रक्तदान
ता.प्र कवीश्वर मोतकुरवार भामरागड-
श्री श्री दुर्गापूजा समिती भामरागड तर्फे भव्य रक्तदान आरोग्य व रक्त चाचणी शिबीराचे 29 सप्टेंबर 2025 रोज सोमवार सकाळी 10 वाजेपासून साय 4 वाजेपर्यंत दुर्गा मंदिर समोरील मैदानाचा स्टेजवर आयोजित करण्यात आले होते. गावातील नागरिक तसेच दुर्गापूजा समितीतील मंडळचा कार्यकत्यांनी मिळून एकूण 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले. समितीतील तसेच जवळपास 50 ते 60 रुग्णचे आरोग्य तसेच रक्त चाचणी करण्यात आले. शिबीरात भामरागड चे तहसीलदार किशोर बागडे यांनी भेट दिली. रक्तसंकलन करिता उपजिल्हा रुग्णालय रक्त पेडी अहेरी येथील डॉ.के.डी.मडावी निखिल कुमार कोंडापती,सुरज बोरकर,अधीपरिचारीका सावित्री मडावी भामरागड येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिष धकाते यांचा उपस्थितित आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सतीश तिरणकर त्याची चमू च्या सह्यायाने आलेले रुग्णचे आरोग्य तपासणी तसेच रक्त तपासणी करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबीराचे संयोजक ओमकार पुजलवार तसेच श्री श्री दुर्गापूजा समितीचे अध्यक्ष प्रदीप कर्मकार, उपाध्यक्ष प्रवीर बिस्वास, सचिव महेंद्र कोठारे,कोषाध्यक्ष राकेश मंडल, सह सचिव अनंत बिस्वास, बिपलाव सरदार, उज्जव बिस्वास अभय बोस, आशु हलदार, तपण मंडल, संतोष बडगे, तपेश हलदार,गोविंद चक्रवती, ज्ञानेश्वर भांडेकर, दादू गफ्फार शेख, असिफ सुफी तसेच समितीचे मंडळी उपस्थित राहून शिबिरात सहकार्य केलेत. आलेला रुग्णांना फळे, बिस्किटे तसेच ORS जुस वाटप करण्यात आले.रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना मान्यवरांचे हस्ते रक्तदान प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.