सहसंपादक श्याम मशाखेत्री
चंद्रपूर:
श्री माता महाकाली महोत्सव २०२५ अंतर्गत आयोजित कार्यक्रमांमध्ये सुप्रसिद्ध फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या आणि सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका साधना सरगम यांनी सादर केलेला भक्तिसंगीताचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसर भाविकांनी खचाखच भरून गेला होता. यावेळी साधना सरगम यांचे स्वागत करून त्यांना माता महाकालीची मूर्ती भेट म्हणून दिली. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,चंद्रपूर वरिष्ठ पदाधिकारी मा. श्री. संदीप जी देशपांडे तसेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री हंसराज भैय्या अहिर,आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.
साधना सरगम यांच्या भक्ती सुरांनी संपूर्ण वातावरणात भक्तीभावाची लहर पसरली. त्यांच्या सुरेल गायनामुळे उपस्थित भाविक भारावून गेले आणि प्रत्येक गीतातून दैवी आनंदाचा अनुभव घेतला. श्री माता महाकाली महोत्सवाच्या या अविस्मरणीय क्षणाने भक्तांच्या मनात अद्वितीय आध्यात्मिक छाप सोडली.