प्रतिनिधी प्रीतम गग्गुरी
राजाराम (वार्ताहर )
अहेरी तालुक्यातील राजाराम गावातील 76 वर्षीय वृद्धाचे नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये निधन
अहेरी: अहेरी तालुक्यातील खांदला राजाराम येथील रहिवासी शिवराम गोसाई बामनकर (वय ७६) यांचे वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी घडली होती, जेव्हा ते आपल्या गाई चराईसाठी जंगलात गेले होते.
शिवराम बामनकर यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. मात्र, वयाच्या ७६ व्या वर्षीही त्यांनी हिंमत न हारता कुऱ्हाडीने वाघाशी दोन हात केले आणि त्याला पळवून लावले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने राजाराम, अहेरी, चंद्रपूर आणि त्यानंतर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आज, दिनांक २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी त्यांच्या मूळगावी राजाराम येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.