Advertisements
Home मुंबई डबेवाला संघटनेचा संतोष जाधव डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा बळी

डबेवाला संघटनेचा संतोष जाधव डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा बळी

आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप

मुंबई, दि.26 जून, (प्रतिनिधी)

Advertisements

            कोरोना रुग्ण असलेला मालाड पूर्व येथील रहिवासी आणि डबेवाले संघटनेचा सदस्य संतोष जाधव हा डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाचा बळी असल्याचा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी स. का. पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल केली आहे.

            आमदार अतुल भातखळकर यांच्या मतदारसंघात राहणाऱ्या संतोष जाधव या अवघ्या 38 वर्षाच्या कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू मालाड पूर्व येथील स. का पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 24 जून रोजी झाला. स. का. पाटील रुग्णालयात दाखल असलेल्या या रुग्णाला नायर रुग्णालयांमध्ये हलविण्याचा प्रयत्न रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी केला. परंतु नायर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून आधीच स्पष्टपणे कळविण्यात आले होते की रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नाही त्यामुळे रुग्णाला पाठवू नये. या रुग्णाला जर का स. का. पाटील रुग्णालयातून हलविण्याची आवश्यकता होती असे तेथील डॉक्टरांचे मत होते तर त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क का केला नाही? त्याचबरोबर जवळपासच्या कोणत्याही रुग्णालयात चौकशी केली होती का? महानगरपालिकेने वॉर्ड स्तरावर जे वॉररूम स्थापन केले आहेत त्यांच्याकडे अतिदक्षता विभागातील बेड उपलब्धते बाबतची मागणी कळवली होती का?  एका साध्या ॲम्बुलन्स मधून या रुग्णाला का नेण्यात आले? अशा सर्व प्रश्नांची विचारणा आमदार भातखळकर यांनी प्रशासनाला केली आहे. त्यामुळे या संपूर्ण हलगर्जीपणाची चौकशी करावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे  दाखल करावेत अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

पोलीस उपनिरीक्षकाचा , महिला पोलीस उपनिरीक्षकावर अत्याचार… नवी मुंबई मधील धक्कादायक घटना…महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…

प्रतिनिधी:दिलीप सोनकांबळे नवी मुंबई : प्रेमाचे नाटक करुन लग्नाचे आमिष दाखवत पोलीस उपनिरीक्षकाने महिला उपनिरीक्षकावर बलात्कार केल्याची घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस...

आईने केली दोन मुलांची हत्या ! नंतर स्वत:ही हाताची नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबई : घणसोली गावात राहणाऱ्या एका विवाहितेने आपल्या मुलांची हत्या करून स्वतःही हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित जखमी महिलेवर नवी...

शिवसेनेच्या दसर्या मेळाव्यात सर्व अपक्ष आमदारांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार

एकनाथ शिंदे गटाचा शिवसेना दसरा मेळावा मुबंई येथे सुरू आहे. यावेळी शिंदे गटातील सर्व अपक्ष आमदारांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

तिथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचत नाही…विद्यार्थी कधी ऑटोने तर कधी जातात पिकअप वरती बसून…

बळीराम काळे, जिवती जिवती:(तालुका प्रतिनिधी) माणिकगड पाहाडावरील चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील तसेच जिल्ह्याच्या पश्चिम व दक्षिणेला तेलंगणा राज्याची सीमा लागून असलेला अतिदुर्गम व अतिमागास अशी...

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय…

चंद्रपुर: भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा...

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!