नागपुरात रक्ताचा सडा; एस. बी. एल. बारूद कंपनीत भीषण स्फोट १८ कामगारांचा मृत्यू.
२५ ते ३० कामगार गंभीर भाजल्याची प्राथमिक माहिती
इंडिया दस्तक न्यूज नेटवर्क नागपूर
काटोल : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्याअंतर्गत येणाऱ्या येणवीरा गावाजवळ स्थापित एस.बी.एल. दारू-गोळा (बारूद) उत्पादन करणाऱ्या कंपनीत आज, १ मार्च रोजी सकाळी अंदाजे ७.०० ते ७.५० वाजण्याच्या दरम्यान भीषण स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या स्फोटात अंदाजे २५ ते ३० महिला व पुरुष कामगार गंभीररीत्या भाजल्याची माहिती मिळत असून जखमींचा अचूक आकडा अद्याप निश्चित झालेला नाही. तसेच १८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचा आवाज परिसरात दूरवर ऐकू गेल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस व आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात येत आहे.
सदर प्रकरणी अधिकृत व सविस्तर माहिती नागपूर पोलीस तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्याकडूनच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राऊळगाव ता. काटोल येथील बारुद कंपनीत स्फोट १५ जखमींना नागपूरला हलविले. मोठ्या प्रमाणात आग. बचावकार्य सुरु.जखमींना ऑरेंज सिटी रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे .







