Home Breaking News ट्रॅक्टर ट्रॉली खाली दबून एकाचा मृत्यु…

ट्रॅक्टर ट्रॉली खाली दबून एकाचा मृत्यु…

201

ट्रॅक्टर अपघात

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट :

घोट येथुन जवळच असलेल्या कुदुर्शी येथे ट्रक्टर ट्राली खाली दबुन एका इसमाचा मृत्यु झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली.

मृतक शेत मजुर अशोक कवडु मट्टामी वय ३१ वर्ष राहणार जानाळा (तुकुम ) असे ट्रक्टर ट्राली पलटी होऊन त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला . आरोपी देवीदास धनवान भुरशे वय ४० वर्ष राहणार आमगांव चक नं .१ ता .चामोर्शी हा ट्रक्टर मालक आपल्या ट्रक्टर क्रमांक एम एच ३३ व्ही ६९७१ व ट्राली क्रमांक एम एच ३३ व्ही ७८०१ या क्रमांकाच्या मालक हा आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे साईडला लावीत असतांना ट्रक्टर ची ट्राली अशोक मट्टामी याच्या अंगावर पटली झाल्याने तो त्यात गुदमरून व विटांचा मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानुसार आरोपी चालक देवीदास भुरशे यांच्यावर कलम १०६ ( १) २८१ BNS – २०२३ सहकलम १८४ नुसार गुन्हाची नोंद करण्यात आली सदर गुन्हाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गोंगले करीत आहेत.

Don`t copy text!