घोट येथे चोरट्यांनी केली दोन लाखांचे दागिने लंपास.
प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट :
घरी कोणीही नसल्याची संधी
साधून दोन लाख १७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घोट येथे उघडकीस आली.

घोट येथील अनिल पोरेड्डीवार यांच्या घरी भाड्याने राहत असलेल्या जितेंद्र गंगाराम दुधे यांच्या मालकीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. जितेंद्र दुधे हे आपल्या कुटुंबासोबत १८ फेब्रुवारी रोजी परगावी गेले होते. याचाच गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी रात्री घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपये किमतीची १० ग्रॅमची सोनसाखळी, १४ हजार रुपये किमतीच्या जुन्या बाऱ्या, ५६ हजारांचे मंगळसूत्र, ३५ हजारांच्या सोन्याच्या २ बॉली, १४ हजारांची सोन्याची जिवती, २१ हजारांची सोन्याची अंगठी, ७ हजार रुपयांच्या ५ ग्रॅम चांदी मनगट्या, असा एकूण २ लाख १७ हजार रुपयांचे दागिने चोट्यांनी लंपास केले.या घटनेची घोट पोलिस मदत केंद्रात गुन्हा नोंद केला आहे.पुढील तपास सुरू आहे.







