Home Breaking News माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली जिल्हाभरातील 44 माओवादी स्मारके गडचिरोली पोलिसांनी केले उध्वस्थ…

माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली जिल्हाभरातील 44 माओवादी स्मारके गडचिरोली पोलिसांनी केले उध्वस्थ…

151

माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली जिल्हाभरातील 44 माओवादी स्मारके गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ कडून उध्वस्त

जिल्हा प्रतिनिधी सतीश कुसराम

सी-60, सीआरपीएफ व जिल्हा पोलीस दलाचे 18 पथकातील सुमारे 800 जवानांनी अभियान राबवून एकूण 44 माओवादी स्मारके एकाच दिवसात केली नष्ट
गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद्यांच्या दहशतीचे शिल्लक उरलेले शेवटचे प्रतीक नष्ट करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध
पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल

दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला गडचिरोली जिल्हा हा माओवाददृष्टया अतिसंवेदनशील आहे. येथील जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माओवाद्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये माओवादी स्मारकांची निर्मिती केली जात होती. मात्र गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जाणा­या प्रभावी माओवादविरोधी अभियानांमूळे जिल्ह्रातील माओवादी चळवळ जवळजवळ संपूष्टात आली असून, सामान्य नागरीकांच्या मनात माओवाद्यांची असलेली भिती कमी होताना दिसून येत आहे. याच पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाकडून माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेले जिल्हाभरातील एकूण 44 माओवादी स्मारके आज दिनांक 18 फेब्राुवारी रोजी नष्ट करण्यात आले आहेत.

गडचिरोली जिल्ह्रात अनेक ठिकाणी माओवाद्यांनी जनतेच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी स्मारक उभारलेले असल्याचे निदर्शनास आले होते. यावरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने सुरक्षा व उपाययोजना करून आज दिनांक 18 फेब्राुवारी रोजी 16 बिडीडीएस पथक, विशेष अभियान पथक, सीआरपीएफ व विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील मिळून एकूण 18 पथकंातील जवानांनी जिल्ह्रातील विविध जंगल परिसरात शोध अभियान सुरु केले. यादरम्यान एकूण 15 पोस्टे/उपपोस्टे/पोमकें हद्दीतील एकूण 44 स्मारके माओवाद्यांनी बांधलेली असल्याचे मिळून आले. सदर माओवादी स्मारकांची व परिसराची बिडीडीएस पथकाने कसून तपासणी केली व त्यानंतर जवानांनी सदर स्मारके उध्वस्त केली आहेत. यामध्ये एटापल्ली उपविभागातील 18, हेडरी उपविभागातील 17, भामरागड उपविभागातील 05, जिमलगट्टा उपविभागातील 02, धानोरा उपविभागातील 01 व पेंढरी उपविभागातील 01 असे एकूण 44 माओवादी स्मारकांचा समावेश आहे. माओवाद्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणा­या अतिदुर्गम पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी व गट्टा (जां.) इत्यादी गावांतील माओवाद्यांची स्मारके उध्वस्त करून गडचिरोली पोलीस दलाने परिसरातील नागरिकांमध्ये माओवाद्यांची असलेली दहशत संपवलेली आहे. ही केवळ भौतीक स्मारके नसून माओवाद्यांच्या हिंसाचार आणि दहशतीची निशानी होते. मात्र गडचिरोली पोलीस दलाने ही स्मारके नष्ट केल्याने ग्रामस्थंामध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण होऊन पोलीस दलाप्रती व प्रशासनाप्रती त्यांचा विश्वास वृद्धींगत झाला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. व पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोेजे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक व विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पार पाडली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळ जवळपास संपूष्टात आली असून, जिल्ह्रातील नागरिकांसाठी सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल नेहमीच प्रयत्नशिल आहे. पोलीस दल खंबीरपणे जिल्ह्रातील नागरिकांच्या पाठीशी उभे असून कोणीही माओवाद्यांच्या भूलथापांना बळी पडू नये.”

Don`t copy text!