Home Breaking News चौडामपल्ली येथे माता महाकाली देवस्थानात भव्य पूजा सोहळा; आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम...

चौडामपल्ली येथे माता महाकाली देवस्थानात भव्य पूजा सोहळा; आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती…

177

चौडामपल्ली येथे माता महाकाली देवस्थानात भव्य पूजा सोहळा; आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती.

प्रतिनिधी गौरव बुरांडे

अहेरी तालुक्यातील चौडामपल्ली येथे माता महाकाली देवस्थानात अरुण मुक्कावार यांच्या पुढाकाराने भव्य व भक्तीमय पूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला मा. आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विधिवत पूजा-अर्चना व मंत्रोच्चारात माता महाकालीची महाआरती करण्यात आली. आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी देवस्थानात दर्शन घेऊन परिसरातील नागरिकांच्या सुख-समृद्धी, शांती व विकासासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत धार्मिक परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
अरुण मुक्कावार यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रभावीपणे पार पाडले. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहात पार पडला. देवस्थान परिसर फुलांची सजावट, रोषणाई आणि भक्तिमय वातावरणाने नटला होता.
कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळाच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. चौडामपल्ली व परिसरातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला.
या भव्य पूजा सोहळ्यामुळे गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून सामाजिक ऐक्य व एकात्मतेचा संदेशही देण्यात आला.

Don`t copy text!