“एटापल्ली टोला येथे क्रीडा स्पर्धांचा थाटात समारोप; प्रज्वल नागुलवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण”
प्रतिनिधी आदित्य चिप्पावार
एटापल्ली (गडचिरोली) :
एटापल्ली टोला येथे आयोजित व्हॉलीबॉल व कबड्डी क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला क्रीडाप्रेमी नागरिकांसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बंटी मोहुंले, पाटील देवाजी पुंगाठी, लालूजी कंगाली, माजी नगरसेवक रमेश मठामी, रावजी दुर्वा, रमेश भोयर सर, बिरा हिचामी, दिलीप मठामी, रोहित हलामी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले—
व्हॉलीबॉल स्पर्धा :
प्रथम पारितोषिक – आंबटपल्ली संघ
द्वितीय पारितोषिक – एटापल्ली टोला संघ
तृतीय पारितोषिक – डूमें संघ
कबड्डी (अ गट) :
प्रथम पारितोषिक – गेदा संघ
द्वितीय पारितोषिक – एटापल्ली टोला संघ
तृतीय पारितोषिक – कृष्णार संघ
कबड्डी (ब गट) :
प्रथम पारितोषिक – कृष्णार संघ
द्वितीय पारितोषिक – एटापल्ली टोला संघ
तृतीय पारितोषिक – डूमें संघ
महिला कबड्डी :
प्रथम पारितोषिक – डोडी टोला संघ
द्वितीय पारितोषिक – एटापल्ली टोला संघ
तृतीय पारितोषिक – कृष्णार संघ
संपूर्ण पारितोषिक वितरण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते अजय भाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना प्रज्वल नागुलवार यांनी ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडासंस्कृती रुजवण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे सांगत, पुढील काळातही क्रीडा व युवकांच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने प्रयत्नशील राहील, असे मत व्यक्त केले.







