Home Breaking News GMR वारालक्ष्मी फौंडेशन तर्फे आनंद निकेतन महाविद्यालयात कौशल्यविकास कार्यशाळा…

GMR वारालक्ष्मी फौंडेशन तर्फे आनंद निकेतन महाविद्यालयात कौशल्यविकास कार्यशाळा…

102

GMR वारालक्ष्मी फौंडेशन तर्फे आनंद निकेतन महाविद्यालयात कौशल्यविकास कार्यशाळा

प्रतिनिधी संकेत कायरकर 

वऱोरा :
विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ व्हावी, या उद्देशाने GMR वारालक्ष्मी फौंडेशन तर्फे आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन, वरोरा येथे सोमवारी (१९ जानेवारी) कौशल्यविकास जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत GMR समूहामार्फत राबविण्यात येणाऱ्या मोफत कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या वेळी ज्ञानेश्वर गायकवाड, (Program Executive, GMR वारालक्ष्मी फौंडेशन) यांनी विद्यार्थ्यांना उद्योगसुसंगत कौशल्ये, रोजगाराच्या संधी तसेच करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. कौशल्यविकासाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मृणाल काळे, प्राचार्य, आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वऱोरा हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञानासोबत कौशल्यविकासाकडेही तितकेच लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. हेमंत भगवान परचाके , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांनी जबाबदारी पार पाडली.त्यांना प्रा. तिलक ढोबळे यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Don`t copy text!