Home Breaking News काळाचा घाला; अंतिम संस्कार आटोपून परतीच्या प्रवासात असलेल्या कारचा अपघात–दोघांचा मृत्यू; तिघेजण...

काळाचा घाला; अंतिम संस्कार आटोपून परतीच्या प्रवासात असलेल्या कारचा अपघात–दोघांचा मृत्यू; तिघेजण गंभीर जखमी…

414

काळाचा घाला; अंतिम संस्कार आटोपून परतीच्या प्रवासात असलेल्या कारचा अपघात–दोघांचा मृत्यू; तिघेजण गंभीर जखमी…

मुख्य संपादक प्रशांत शाहा

गडचिरोली :- नातेवाईकाचे अंतिम संस्कार

आटोपून परतीच्या प्रवासात असलेल्या कारचा अपघात होऊन अनियंत्रित झालेली कार थेट पुलावरून नदीपात्रात कोसळली. यात कारमधील दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज, मंगळवार २० जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास अहेरी तालुक्याच्या आष्टी महामार्गावरील मुक्तापूर येथील दीना नदीच्या पुलावर घडली. अपघातात सुनील मुरलीधर कोलपाकवार वय ६५ वर्षे व यादव कोलपाकवार वय ६७ वर्षे, रा. बोरी, ता. अहेरी यांचा अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अर्चना यादव कोलपाकवार वय ६० वर्षे, रा. आष्टी, ता. चामोर्शी, अभिजित यादव कोलपाकवार वय ३५ वर्षे व पद्मा सत्यनारायण कोलपाकवार वय ५५ वर्षे अशी गंभीर जखमिंची नावे असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारार्थ चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात येथे हलविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार,अहेरी तालुक्याच्या आलापल्ली-आष्टी या राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात काल, सोमवार १९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रवींद्र तंगडपल्लीवार वय ४७ वर्षे, रा. नागेपल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली यांचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. प्रकरणी त्यांची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार, आज मंगळवारी रवींद्र तंगडपल्लीवार यांचे अंतिम संस्कार पार पडले. यासाठी कोलपाकवार कुटूंबीय कारने आले होते. त्यांचे अंतिम संस्कार आटोपून परतीच्या प्रवासात असतांनाच सदरचा अपघात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Don`t copy text!