आनंद निकेतन महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विद्यार्थ्यांची BSF व CRPF मध्ये निवड
प्रतिनिधी संकेत कायरकर
वरोरा :
वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन येथील एन.सी.सी. विभागातील विद्यार्थ्यांनी देशसेवेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महाविद्यालयातील एन.सी.सी. मध्ये शिकणाऱ्या आकाश बरडे यांची सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF) मध्ये, तर स्वप्निल पवार आणि शुभम खस यांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) मध्ये निवड झाल्याबद्दल शहरात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांसह त्यांचे मार्गदर्शक लेफ्टनंट संदीप पारखी सर यांचेही कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे सर तसेच एन.सी.सी. विभागाच्या मार्गदर्शनाला दिले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीच्या हप्त्यातही महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्समध्ये निवड झाली होती. यावरून विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन लाभल्यास यश नक्कीच मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.







