Home Breaking News हरवलेले चोरीला गेलेले ११ मोबाइल मूळमालकाना परत…

हरवलेले चोरीला गेलेले ११ मोबाइल मूळमालकाना परत…

241

कूरखेडा पोलीसांची कार्यवाही

जिल्हा प्रतिनिधी सतीश कुसराम

कूरखेडा- कूरखेडा पोलीस स्टेशन चा हद्दीतून हरवलेले चोरीला गेलेले तब्बल ११ मोबाइल संच एकूण किंमत २ लक्ष ४ हजार ५०० रू.यांचा कूरखेडा सायबर गून्हे तपास चमूचा वतीने छळा लावत आज दि ५ जानेवारी रोजी पोलीस स्टेशन येथे मूळमालकाना परत करण्यात आले.
कूरखेडा पोलीस स्टेशन येथील सि इ आय आर पोर्टल चा माध्यमाने हरवलेल्या मोबाइल चा छडा लावण्यात पोलीसाना यश यावेळी अनिल किरंगे रा.मेंढा केशव कोसरे रा नवरगांव दूर्गावती बेले रा जांभूळखेडा अतूल राऊत रा कूरखेडा निलकंठ राऊत रा मालदूगी अतूल कल्लो रा धानोरी रेखचंद बंसोड रा वडेगांव खेमराज राऊत रा परसटोला महेन्द्र कूमार जांभूळकर रा तळेगांव शिवशंकर ढवळे रा घाटी अंकीता निमजे रा येरंडी यांचे हरवलेले चोरीला गेलेले मोबाइल संच उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या हस्ते त्याना परत करण्यात आले याप्रसंगी ठाणेदार महेन्द्र वाघ सायबर तपास चमू प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संदिप ताराम साहायक शिपाई पंकज नवघरे,अमोल आलाम, राकेश येरणे हजर होते यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांनी मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास तातडीने इ एम आय नंबर व बिल सह पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करावी असे आवाहन केले आहे.

Don`t copy text!