Home Breaking News सिकलसेल मुक्त चंद्रपूरसाठी विशेष जनजागृती व तपासणी मोहीम…

सिकलसेल मुक्त चंद्रपूरसाठी विशेष जनजागृती व तपासणी मोहीम…

139

जिल्हा प्रतिनिधी गौरव मोहबे

चंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल ॲनेमिया प्रतिबंध व नियंत्रणासाठी विशेष जनजागृती व तपासणी मोहीम
15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

या विशेष मोहिमेंतर्गत 40 वर्षांपर्यंतच्या नागरिकांची सिकलसेल तपासणी, रुग्ण व वाहकांची नोंदणी, आवश्यकतेनुसार HPLC / इलेक्ट्रोफोरेसीस चाचण्या, तसेच रुग्णांना योग्य उपचार व समुपदेशन सेवा देण्यात येणार आहे. भावी पिढीतील सिकलसेल आजाराचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्व समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

ही मोहीम जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार असून आवश्यक मनुष्यबळ व तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जनजागृतीसाठी पोस्टर, पत्रके, सोशल मीडिया, तसेच गृहभेटींचा वापर करण्यात येणार आहे.

सिकलसेलसारख्या अनुवंशिक आजाराबाबत जनजागृती वाढवणे व वेळेत तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असून सर्व नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा व सिकलसेल मुक्त चंद्रपूर घडविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Don`t copy text!