विदर्भ ब्युरो चीफ गौरव मोहबे
चंद्रपूर:
जर आपल्याला दारू बसून प्यायची आहे तर आपण बार मध्ये जात असतो हे खरी पण आपल्याला जर दारू आपल्या घरी न्यायची असेल व ते थोडी स्वस्त पाहिजे असेल तर आपण वाईन शॉप मध्ये जातो.
हे तर सगळ्यांनाच माहित आहे
पण हे माहीत आहे का की वाईन शॉप मध्ये आपण दारू घेऊन तिथे पिऊ शकत नाही कारण त्या वर बंदी असते.तसे आढळल्यास आपल्या वर सुद्धा गुन्हा नोंद होऊ शकतो.
वाईन शॉप वाल्या सावकार ला त्याची लायन्स रद्द होण्याचे पण नियमात असते.परंतु सांगायचे म्हणजे हे की, तुकूम स्थितीत डावरा वाईन शॉप हे कोणाच्या आशीर्वादाने चालत आहे? हे अजून काही समजेना.
चंद्रपूर येथील गर्दीचे ठिकाण असलेल्या तुकूम येथील डावरा वाईन शॉप समोर तर तुम्हाला चकणा,ग्लास, पाणी बॉटल पण मिळून जाईल,आणि पिणाऱ्या शोकीन माणूस सुद्धा थेट रस्त्यावर दुचाकी,चार चाकी उभी ठेऊन आपल्या पिण्याचा कार्यक्रम करत आहेत.
एस टी वर्कशॉप सुमित्रा नगर येथील डावरा वाईन शॉप मध्ये हे शक्य कसे होत आहे.यात डावरा वाईन शॉप वाल्यावर चंद्रपूर पोलिसांचा आशिर्वाद तर नाही?असा गंभीर प्रश्न देखील नागरिकात उपस्थित होत आहे
सध्या दिवाळी सण समोर आहे अनेक परिवार बाजार पेठ गाठ्यास व्यस्त आहेत यावेळी तुकूम येथील डावरा वाईन शॉप समोर अपघात होण्याची दाट शक्यता दिसत आहे
यावर त्या वाईन शॉप मालकावर कोणती कारवाई होईल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या डावरा वाईन शॉप तुकूम मध्ये चर्चेत असल्याचे दिसून येत आहे.