तालुका प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार
भामरागड:
कोठी पोलिसांनी श्रमदातून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविले
पोलिस म्हणजे फक्त समाजाचा रक्षकच पुरता राहिला नाही त्यांनी आजच्या परिस्थितीत अनुरूप कामात सुद्धा बदल केले आहे असे दिसत आहे
भामरागड तालुक्यातील कोठी हे गाव तालुका मुख्यालयापासून सुमारे 30किमी अंतरावर आहे यावर्षी अत्याधिक पाऊस झाल्याने रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले होते त्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होत असल्याचे दिसल्यावर कोठी पोलिसांनी आपल्या संपूर्ण ठाण्यातील कर्मचारी अधिकारी मिळून श्रमदान करून पडलेले खड्डे बुजविले.
कोठी मार्गावर पडलेल्या खड्या कडे शासनाने लक्ष दिले नाही
म्हणून थेट पोलिस कर्मचारी आपल्या परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी श्रमदानातून संपूर्ण खड्डे बुजवून रस्ता दुसरस्ती केल्याचे बाब समोर आली
कोठी पोलिसांच्या या कर्तव्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे.
यावेळी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप गवळी, पोलिस निरीक्षक कार्तिक दळवी आणि इतर सर्व कर्मचारी मिळून हा रस्ता दुरुस्त करण्यास मदत केली.
हा रस्ता पुढे जात छत्तीसगड राज्यात प्रवेश करतो त्यामुळे या भागात वाहनांची संख्या वाढली आहे त्यामुळे अनुचित कोणती घटना घडू नये म्हणून खड्डे बुजविले त्यामुळे आता त्रास दायक प्रवास हा सुखदायी ठरत आहे