प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार भामरागड
लाहेरी/गडचिरोली: पोलिस मुख्यालयापासून 200 किमी दूर छत्तीसगढ सीमेलगतच्या अतिदुर्गम भागात लाहेरी पोलीस स्टेशन पासून 2 किमी अंतरावर 9 ऑक्टोबर 2009 रोजी माओवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्यात एक अधिकारी व 16 जवान शहीद झाले होते, त्यांच्या कार्याला व शौर्याला उजाळा मिळावा म्हणून.
या वर्षी शहिदांच्या नातेवाईकांना आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून त्यांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आली
तसेच .
पोलिस ठाणे लाहेरी चे प्रभारी अधिकारी गणेश इंगळे CRPF चे पोलिस निरीक्षक सचित्र बिस्वाल, पोनी दत्तात्रय बोरुडे, srpf चे पोलिस उपनिरीक्षक बोंद्रे साहेब यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली
पोलिस स्टेशन चे विद्यमान प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांनी शहिदांच्या कार्याला उजाळा दिला .त्यांचे कार्य भावी पिढीला प्रेरणादायी नक्कीच राहील .तसेच नक्षल चळवळीचे कमरडे पार मोडले आहे तरी काही नक्षल व त्यांचे समर्थक अजूनही सक्रीय आहेत ते भरकटले आहेत त्यांना मुख्य प्रवाहात येणे करीता त्यांनी आत्मसमर्पण करावे , बंदुकीचा मार्ग सोडून विकासाचा मार्ग निवडावा आम्ही त्यांचे स्वागत करू असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन महिला अंमलदार शेवंती सुल्वावार यांनी केले
सदर कार्यक्रमात गावातील नागरीक सरपंच राजेश्वरी बोगामी , ग्रामसेविका जयश्री कुळ संगे, कोमटी ओक्सा, बालाजी बोगामी,शामराव येरकलवार,, शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक रापनजी सर, आश्रम शाळेतील विद्यार्थी,जिल्हा पोलिस चे Asi तलांडे,पोहवा उमेश सूर्जागडे, पोहवा विशाल उमरे, पोहवा राजकुमार आत्राम ,CRPF 37 बटालियन,srpf मुंबई गटाचे अंमलदार उपस्थित होते.
प्रभारी अधिकारी यांनी उपस्थित स्थानिक नागरिकांशी संवाद साधत शासकीय योजनांच्या माहिती देण्यात आली, विद्यार्थ्यांना बिस्कीट, व चॉकलेट वाटप करण्यात आले.