आष्टीच्या मुख्य चौकात मध्यरात्री आढळला सात ते आठ फूट लांबीचा अजगर…

63

आष्टीच्या मुख्य चौकात मध्यरात्री आढळला सात ते आठ फूट लांबीचा अजगर साप

सर्पमित्र व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिले जीवनदान

गौरव वाट चामोर्शी तालुका प्रतिनिधी
आष्टी
आष्टी येथील मुख्य चौकात दिनांक आठ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडे बारा एक वाजताच्या दरम्यान सात ते आठ फूट लांबीचा अजगर साप काही नागरिकांना आढळला नागरिकांनी लगेच आष्टी येथील सर्पमित्रांना याची माहिती दिली. सर्पमित्र कुणाल सूनतकरी, प्रणय करमकर, सूरज सोयाम यांनी मोठया शिताफीने अजगर सापास पकडले. व सकाळी मार्कडा कंसोबा च्या वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली चपराळा अभयारण्यात सुखरूप सोडण्यात आले. यावेळी सर्पमित्र कुणाल सूनतकरी, प्रणय करमकर, सूरज सोयाम , वनरक्षक नवरत्न सोनवणे, प्रवीण परसावार, भवानी नीलम, राठोड यांच्या उपस्थितीत होते.

मुख्य चौकातच अजगर साप आढळल्याने उपस्थित नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली. हा अजगर साप वैनगंगा नदी मार्गे शेतातून आष्टी येथील मच्छीबाजार परिसरात व तेथून मुख्य चौकात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.