पोलिस स्टेशन व आरोग्य केंद्र रेगडीच्या वतीने भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन….

211

पोलिस स्टेशन व आरोग्य केंद्र रेगडीच्या वतीने भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन….
रेगडी/प्रतिनिधी
दिनांक ०१ ऑक्टोबर राष्ट्रीय रक्तदान दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज दिनांक 02/10/2025 रोजी गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून, पोलीस स्टेशन रेगडी च्या वतीने राष्ट्रीय रक्तदान दिवसाच्या औचित्य साधून ,पोलीस स्टेशन रेगडी तथा प्रा. आरोग्य केंद्र रेगडी, यांच्या संयुक्त विध्यमाने पोलीस स्टेशन रेगडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर रक्तदान शिबीरात पोस्टेतील अधिकारी व अंमलदार व SRPF अंमलदार असे 10 व रेगडी येथील युवा रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदर रक्त दान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस उपनिरिक्षक कुणाल इंगळे , डॉ उमाकांत मेश्राम,प्रशांत शाहा, सागर मांडवगडे, व पोलिस स्टेशनचे अंमलदार यांनी सहकार्य केले