एटापल्ली “एक दिवस – एक तास – एकसाथ” स्वच्छता मोहीम…

107

समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार

एटापल्ली प्रतिनिधी आदित्य चिप्पावार :

“स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग, समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्था व श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 01 ऑक्टोबर 2025 रोजी को-ऑपरेटिव्ह बँक परिसरात “एक दिवस – एक तास – एकसाथ” स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या उपक्रमात डॉ. श्रुती गुब्बावार मॅडम (रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), प्रा. चिन्ना पुंगाटी सर (रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), डॉ. बाळकृष्ण कोंगरे सर, राघवेंद्र सुल्वावार (अध्यक्ष, समर्पण संस्था), राहुल कुळमेथे (उपाध्यक्ष), अमोल गजाडीवार (सचिव), संतोष गंदेशिरवार व अंकित दिकोंडावार (सदस्य) तसेच श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

भगवंतराव महाविद्यालयाचे स्वयंसेवक आणि मंडळाचे पदाधिकारी–सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. परिसरातील कचरा व घाण साफ करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली.