या मार्गावरील मानव विकास मिशन अंतर्गत बेसेस बंद विधार्थीचे शैक्षणिक नुकसान
भाजपा तालुकध्यक्ष चांगदेव फाये यांची रस्ते दुरस्थितीची मागणी.
जिल्हा प्रतिनिधी नितेश खडसे
कुरखेडा तालुक्यातील आंधळी नवरगाव व बेलगाव खैरी या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या मार्गावर पावसाळ्यात मोठे मोठे जागोजागी खड्डे पडल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक ,मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे या रोडची तात्काळ दुरुस्ती करून हा मार्ग सुकर करावा अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.
या रोडवर खड्डे असल्याचे कारण पुढे करून एसटी महामंडळाने या मार्गावरून चालणारी मानव विकास मिशन अंतर्गत बसेस बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत या मार्गावरून प्रवाशांना मार्गक्रमण करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असून या मार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मागील १० दिवसापासून या मार्गावर खड्डे पडल्याने बसेस बंद करण्यात आले आहेत या संदर्भात कारण विचारले असता वाहक चालक यांच्याकडून एसटीची नुकसान झाल्यास त्यांच्याकडून नुकसानी दंड वसूल करण्यात येते तोपर्यंत खड्डे बुजवल्या जात नाही तोपर्यंत या मार्गावरून एसटी चालणे कठीण असल्याचे मत बस प्रमुख शिवणकर यांनी व्यक्त केला आहे.
या मार्गावरील खड्डे लवकर बुजवण्यात यावे व बसेस सुरक्षितपणे सुरू करण्यात यावे याकरिता आंधळी नवरगाव परिसरातील नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा सबंधित विभागाला दिला आहे.
रस्ता पाहणी करताना भाजपा तालुका अध्यक्ष तथा माजी पं.समिती सदस्य चांगदेव फाये, यांच्या सह प्रा.विनोद नागपूरकर,लक्ष्मण धूळसे,देवा कवाडकर, केशव किरसान, साईनाथ कवाडकर काशिनाथ कवाडकर, प्रभाकर मानकर, हरिदास खरकाटे उपस्थित होते.