अंधारी नदीत मृताअवस्थेत आढळलेला वाघ गेला वाहून…

148

गोंडपिपरी प्रतिनिधी / शरद कुकुडकर

गोंडपिंपरी – पोंभुर्णा सीमेवरील अंधारी नदीत शुक्रवारी सकाळी ७ वाजता दरम्यान स्मशान घाट भिमनी नदीजवळ शेतशिवार परीसरातील शेतकऱ्यांना मृताअवस्तेत वाघ दिसला.गावकऱ्यांनी वन विभागाला घटनेची माहिती दिली.तासाभरात वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र वन विभागाचे अधिकारी येईपर्यंत पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अंधारी नदीतून भिमनी – वढोली मार्गे मृताअवस्थेत आढळलेला वाघ वाहून गेला.अनेकांनी वाघाची व्हिडिओ फित घेतली.
मृताअवस्थेत आढळलेला वाघ हा कोणत्या वनपरिक्षेत्रातील आहे. हा प्रश्न निर्माण झाला.कुलथा,आष्टी पर्यंत राबवलेल्या सर्च मोहिमेदरम्यान वाघाचा मृतदेह सापडला नाही.सध्या स्थितीत शेत शिवारात रानडुकरांचा हैदोस असल्याने शेतपिकांच्या सौरक्षणासाठी शेतात मोठ्या प्रमाणात विद्युतदारांचा करंट लावल्या जाते.मध्यचंदा वनविभागात यापूर्वी अनेक वन्यप्राण्यांची शिकारीच्या घटना घडल्या त्यामुळे वाघाचा मृत्यू घातपात की नैसर्गिक हा विषय चर्चेचा ठरला आहे.

गडचिरोली वनविभागाची सर्च मोहीम.
नदी पात्रात वाहून गेलेला वाघाचा मृतदेह गडचिरोली वनविभागाच्या हद्दीत गेल्याने गडचिरोली वन विभागाने सर्च मोहीम रबली वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अद्यापही त्यांना वाघाचा मृतदेह आढळला नाही.