धानोरा तालुका काँग्रेस कमिटी द्वारा आढावा बैठक संपन्न…

91

सहसंपादक श्याम मशाखेत्री 

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसाण, गडचिरोली जिह्वा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, गडचिरोली विधानसभा निरीक्षक संदेशजी सिंगलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

धानोरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीसाठी तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवारांनी गावोगावी जाऊन मतदारांशी संपर्क साधणे, स्थानिक समस्यांचा अभ्यास करणे आणि प्रचारयोजना आखणे यासंबंधी मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक विभागासाठी कामाचे नियोजन, सदस्य संकलन आणि प्रचार साधने, जनजागृतीसाठी नियोजित कार्यक्रम, आगामी निवडणुकांसाठी स्थानिक समस्या आणि गरजा समजून घेणे आणि निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी अधिक ठोस करणे व आगामी निवडणुकीसाठी आवश्यक तयारी यामध्ये निश्चित करण्यात आली.

यावेळी माजी जि. पं. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजित कोवासे, महिला जिल्हाध्यक्षा ऍड. सौं कविता मोहरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटणकर, तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, माजी जि. पं. सदस्य विनोद लेनगुरे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, राजू जीवानी, अब्दुल पंजवानी, दिवाकर निसार, धिवरू मेश्राम,पुरुषोत्तम बावणे,सौं. शेवंता हलामी, सौं. मंगला करंगामी, सौं. सीमा सयाम, सौं. अक्षरा जिल्लेवार यांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.