चंद्रपूर नागपूर महामार्गावर द बर्निंग कार… आल्कायजर कार जळून खाक…

172
Breaking News label banner isolated vector design

प्रतिनिधी गौरव मोहबे

चंद्रपूर/वरोरा – १९ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर नागपूर महामार्गावर आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला, काही क्षणात वाहन जाळून राख झाले. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.

नागपूर निवासी अमीन हारून अली हाजी हे आपल्या दोन सहकाऱ्यांसह चंद्रपूर वरून नागपूरला अलक्झर वाहन क्रमांक mh ३१ fu ६६७३ ने निघाले होते, वरोरा मधील रत्नमाला चौकात पोहोचल्यावर अचानक वाहनातून धूर निघू लागला, वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवीत तात्काळ वाहनातून सर्वाना खाली उतरवीत जवळच्या पेट्रोल पंपावरून अग्निविरोधक यंत्र आणण्यास गेले मात्र वाहनाने तोपर्यंत पेट घेतला होता.

परत येईपर्यंत वाहन जाळून खाक झाले, मात्र वाहनातील नागरिक वेळेपूर्वी उतरल्याने मोठी घटना टळली.