बापरे बाप चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्यात दोन दिवसात तिसरा बळी-चिमुकला ठार..

696

प्रतिनिधी गौरव मोहबे
सिंदेवाही:

सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी या छोट्याशा गावात आज गुरुवारी रात्री साडेसातव्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली. गावातीलच दुसरीत शिकणाऱ्या प्रशिल बबन मानकर (वय ७) हा आपल्या काकासोबत गणेश मंडळाचा जेवण करण्या साठी गेला होता.
जेवण करून आपल्या काका सोबत घरी पोहताच वाघाने त्याला अंगणातून घेऊन गेल्याची चित्तथरारक घटना गडबोरी येथे घडली.

या चिमुकल्याला अंगणातून पट्टेदार वाघाने उचलून नेले. या घटनेमुळे गावात शोककळा व भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

तालुक्यातील नवरगावपासून नऊ किलोमीटर अंतरावरील गडबोरी हे गाव जंगल व टेकडीला लागून वसलेले आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचा धोका अनेक वर्षांपासून कायम आहे. नागरिक वन्यप्राण्यांच्या दशहतीत रात्रीचे जिवन जगत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. आज गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास प्रशिल घराच्या अंगणात जाताच त्याला त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने संधी साधत त्याला उचलून नेले,अशी माहिती गडबोरी येथून येत आहे.