महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे उद्या चंद्रपुरात…

189

महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे उद्या चंद्रपुरात

प्रतिनिधी गौरव मोहबे

चंद्रपूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे
दि.२० सप्टेंबर २०२५ रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत असून दुपारी १२ ते १ या वेळेत जिल्हा नियोजन सभागृह, चंद्रपूर येथे नागरिकांचे निवेदने स्वीकारणार आहेत.

बावनकुळे हे आज गडचिरोलीचे सहपालक मंत्री आशिष जयस्वाल यांच्या सोबत गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर असल्याची माहिती आहे.

गडचिरोली येथूनच ते उद्याला सकाळी चंद्रपूर येथे येतील

असे म्हणले जात आहे.

तरी चंद्रपूर जिल्हयातील ज्या नागरिकांना महसूल मंत्री यांना निवेदने द्यावयाची आहे, त्यांनी दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते १ या दरम्यान जिल्हा नियोजन सभागृह, चंद्रपूर या ठिकाणी उपस्थित रहावे, असे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.