प्रतिनिधी नितेश खडसे गडचिरोली
गडचिरोली :- नुकतेच रविवार १४ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील परायणार गावाचा रहिवासी असलेल्या एका ३२ वर्षीय जहाल नक्षलवाद्यास जवानांनी भामरागड तालुक्याच्या तिरकामेटाच्या जंगल परिसरातून अटक केली होती. शनिवारी विशेष अभियान पथकातील जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांनाच ताडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या तिरकामेटा जंगल परिसरात एक संशयित व्यक्ती आढळून आला होता. त्यास ताब्यात घेऊन अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात नेऊन चौकशी केली असता, चौकशीअंती तो शंकर भिमा महाका वय ३२ वर्षे, रा. परायणार, ता. भामरागड, जि. गडचिरोली येथील रहिवासी असलेला भामरागड दलमचा सदस्य असल्याचे निष्पन्न झाले होते. अश्यातच आता आज, बुधवार १७ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील मोडस्के गावच्या जंगल परिसरात पोलीस आणि
नक्षल चकमक उडाली. चकमकीत दोन महिला नक्षली ठार झाल्या असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच घटनास्थळावरून दोन मृतदेहांसह एक स्वयंचलित एके ४७ रायफल, एक अत्याधुनिक पिस्तुल, जिवंत दारुगोळा व अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आले आहेत.
एटापल्ली तालुक्याच्या मोडस्के जंगल परिसरात गट्टा दलमचे काही नक्षलवादी दबा धरुन बसल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस स्टेशन गट्टा जांबियाचे पोलीस पथक व केंद्रीय राखीव दलाचे १९१ बटालियनच्या ई कंपनीकडून जंगल परिसराला चारही बाजूंनी घेराबंदी घालण्यात आली. त्यानंतर अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयाचे अप्पर पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनीही पोलिसांच्या सी-६० दलाची पाच पथके रवाना केली. त्यानुसार जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असतांनाच नक्षलवाद्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तर देत गोळीबार केला असता चकमक सुरू झाली.
परिसराला चारही बाजूंनी घेराबंदी घालण्यात आली. त्यानंतर अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयाचे अप्पर पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनीही पोलिसांच्या सी-६० दलाची पाच पथके रवाना केली.त्यानुसार जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असतांनाच नक्षलवाद्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तर देत गोळीबार केला असता चकमक सुरू असतांनाच काही नक्षली जंगलाच्या दिशेने पळून गेले. चकमकीनंतर शोधमोहीम राबवली असता दोन महिला नक्षलिंचे मृतदेह तसेच नक्षलवादी साहित्य घटनास्थळावरून हस्तगत करण्यात आले आहेत. अद्याप नक्षली महिलांची ओळख पटलेली नसून त्या दिशेने तपास सुरू आहे.