सहसंपादक श्याम मशाखेत्री
चंद्रपूर: शहर महानगर पालिकेचा भ्रष्ट कारभार अजुन एकदा उघडकीस आला आहे. एम ई एल परिसरातील मनपा ची पंडित जवाहरलाल नेहरू शाळा नव्याने बांधकामाच्या जवळच असलेल्या एका खाजगी इमारतीत स्थलांतरित करण्यात आली होती.खाजगी इमारत मालकाशी कोणत्याही प्रकारचा लेखी करार न करता मागील तीन महिन्यांपासून मनपा त्या इमारतीत शाळा चालवीत होती.संबधित इमारतीच्या मालकाने व मुख्याध्यापिकेने मनपा आयुक्तांकडे विद्यार्थ्याच्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.परंतु या मागणीकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केले.त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.वारंवार तक्रार करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने शेवटी इमारत मालकाने शाळेला कुलूप ठोकले.विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागले.शेवटी त्या प्रभागातील माजी नगरसेवक सचिन भाऊ भोयर यांनी पुढाकार घेतला असता मनपा आयुक्तांना जाग आला. व शाळेच्या समस्या सोडवू असे आश्वासन सचिन भाऊ भोयर यांना दिले.परंतु समस्या सोडविण्या ऐवजी मनपा ने शाळा रयतवारी परिसरात हलविली. आयुक्तांच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालक यांना नाहक त्रास सहन करावा लागला.मनपा आयुक्त विपीन पालीवाल हे कमिशन गोळा करण्यामध्येच व्यस्त आहे की काय असा प्रश्न आता पालकांना पडला आहे.